Rani Mukherjee : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या “ओह माय गॉड” फ्रँचायझीमधील नवीन चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार पहिल्यांदाच राणी मुखर्जीसोबत काम करणार असल्याची बातमी समोर आली आहे. मीडियारिपोर्टनुसार, अक्षय कुमारसोबत राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसू शकते. जर ही बातमी खरी ठरली तर ही हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. पिंकव्हिलामधील एका वृत्तानुसार, ओह माय गॉड चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन अंतिम टप्प्यात आले असून, चित्रीकरणाला २०२६ मध्ये सुरुवात करण्यात असल्याचे नियोजित आहे. या चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. चित्रपटाच्या विषयाने प्रेक्षकांच्या मनावर मोठा प्रभाव पाडला. त्यामुळे चित्रपटाला यश मिळाले हे जरी खरे असले तरी दुसरीकडे दोन्ही चित्रपटांना विरोधही करण्यात आला होता. यावेळी तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन अमित राय करत आहेत. चित्रपटाची कथा पूर्वीपेक्षा मोठी आणि अधिक संवेदनशील आणि समकालीन मुद्द्यांवर आधारित असेल, अशी माहिती सांगितली जात आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांचे लक्ष केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नसून सामाजिक समस्यांना प्रभावीपणे चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर मांडणे हे असणार आहे. त्यामुळे अभिनेत्री राणी मुखर्जी नेहमीच तिच्या चित्रपटातील वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. आता ओह माय गॅाड ३ मध्ये देखील ती झळकणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. हेही वाचा : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; १४ नक्षलवादी ठार