Raj Thackeray | Devendra Fadnavis – मनसेचे सर्वेसर्वा असलेले राज ठाकरे हे केवळ पराभूत होणार नाहीत, तर इतिहासातील सर्वात मोठा पराभवाचे ते धनी म्हणून ओळखले जाती, आज मी त्याची भविष्यवाणी करतो, निकाल आल्यानंतरच तुम्ही पहाच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या दोन्ही भावांवर टीकास्त्र सोडले. मुलाखतीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी राज व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी विचारणा करण्यात आली, यावेळी फडणवीस म्हणाले की, जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, मात्र विचारांचा वारसा मिळत नाही. या दोघांनाही विचारांचा वारसा मिळालेला नाही. आज राज व उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, त्याला काहिही अर्थ राहिलेला नाही. कदाचित 2009 मध्ये हे दोघे एकत्र आले असते, तर आजची राजकिय परिस्थिती वेगळी पहायला मिळाली असती. त्या काळात त्यांना मते देखील भरपूर मिळाली असती, असे देखील फडणवीस म्हणाले. फडणवीस बोलताना पुढे म्हणाले की, मी स्पष्ट शब्दांमध्ये सांगतो, या युतीमध्ये राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल, मात्र उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही. राज ठाकरे हे पराभूत होणार आहे, ते ही मोठ्या फरकाने, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.