हेही वाचा – Shahid Afridi : गंभीर-आफ्रिदी वाद पुन्हा उफाळला! रोहित-विराटला सपोर्ट करत आफ्रिदीचे गंभीरवर मोठे टीकास्त्र
\nसनी संधूने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील टी-२० पदार्पणात सौराष्ट्रविरुद्ध खेळताना विजयी खेळी साकारली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात संधूने केवळ ९ चेंडूत ३० धावा चोपल्या होत्या. साई सुदर्शनच्या साथीने महत्त्वपूर्ण भागीदारी रचून त्याने तमिळनाडूला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आगामी मिनी लिलावात या खेळाडूवर सर्वांच्या नजरा असतील, हे सांगण्याचा प्रयत्न अश्विनने या हटके फोटो-संयोजनातून केला आहे.
\n\nसनी संधूवर लागू शकते मोठी बोली –
\n\n\n\n\n\n
\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nView this post on Instagram\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n
\nअबू धाबी येथे १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावात सनी संधू हा अनकॅप्ड ऑलराउंडरच्या गटात आहे. ३० लाख रुपये मूळ किंमत असलेल्या सनीने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत केलेली धमाकेदार कामगिरी पाहता, मिनी लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.