पुणे – ढोल- ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन दीपक मानकर, तृप्ती नीलेश शिंदे, कांता नवनाथ खिलारे या उमेदवारांचे नागरिकांनी पुष्पवृष्टी आणि औक्षण करत स्वागत केले. माजी महापौर दीपक मानकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर येथील हर्षवर्धन मानकर, तृप्ती शिंदे, कांता खिलारे यांच्या प्रचारासाठी प्रभागात बाईक रॅली काढली होती. यावेळी तरुणांसह नागरिकांनी आमचे मत घड्याळालाचा अशा घोषणा देत वातावरण बदलून टाकले. विठ्ठल मंदिर येथे सुरू झालेली दुचाकी रॅली एआरएआय रोड, केळेवाडी, हनुमाननगर, कानिफनाथ मित्र मंडळ चौक, रामबाग कॉलनी, किष्किंधानगर, म्हातोबानगर, सुतारदरा, माथवड अंगण, जयभवानीनगर मार्गे गुरुदत्त रिक्षा स्टँड चौकात संपली. या वेळी दिवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष करण मानकर, राजवर्धन हर्षवर्धन मानकर, गणपत भगत, साष्टे मामा, चंद्रकांत कुदळे, गजानन ढमाले, राजू खरसाडे, मिलिंद वाघमारे, नीलेश शिंदे, नवनाथ खिलारे, वेंकटेश भंडारी, राजू मगर, मच्छिंद्र गोडांबे, अब्बास शेख, जावेद शेख आदी पदाधिकारी, तरुण आणि महिला हजर होत्या. हर्षवर्धन मानकर यांच्यासह तृप्ती शिंदे, कांता खिलारे यांच्या प्रचाराचा झंजावात वाढत असून, प्रभागातील विकासकामांबरोबरच आमच्या सुख-दु:खात २४ तास मतदतीला धावून हर्षवर्धन दादांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास नागरिकांनी दिला, तसेच व्यापारी, उद्योगपती, खेळाडू, महिला, युवाशक्ती यांच्याशी सतत संपर्कात राहणारा, वृद्धांसाठी आधार बनलेले मानकर आमचे जीवन अधिक आनंददायी करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.