The Prada Company : काही महिन्यांपूर्वी जगप्रसिद्ध प्राडा कंपनीने इटलीमधील फॅशन शो मध्ये चक्क कोल्हापूरी चप्पल विकल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. २०१९ मध्ये कोल्हापुरी चपलांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅग देण्यात आले असतानाही असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. या कंपनीविरोधात राज्य सरकारने कारवाईचा इशारा दिला होता. तसेच कोल्हापूरकरांनी कोल्हापुरी चप्पलीसाठी लढा उभा केला होता, अखेर या लढ्याला यश आले असून, जगप्रसिद्ध प्राडा कंपनीसह लिडकॉम आणि लिडकार यांच्यामध्ये मुंबईत कोल्हापुरी चप्पलसाठी सामंजस्य करार झाला असून, ही महाराष्ट्रासाठी खपू अभिमानची मानली जात आहे. या करारामुळे कोल्हापुरी चप्पलांना आता आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल आणि स्थानिक कारागिरांना आर्थिक फायदा होईल. तसेच कोल्हापुरी चप्पलांच्या पारंपरिक कलेला जागतिक व्यासपीठ लाभेल. या करारानुसार, पुढच्या वर्षी २६ फेब्रुवारीपासून प्राडाच्या ४० विक्री केंद्रावर कोल्हापूर चप्पल ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड म्हणून ओळख असलेल्या प्राडा या कंपनीने महाराष्ट्र शासनाचा उपक्रम लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि कर्नाटक सरकारच्या लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात हा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. हा करार मुंबईतील इटालिययन वाणिज्य दूतावासात इटली भारत व्यापारी परिषदेत करण्यात आला आहे. कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पारंपरिक कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कुशल कारागिरांच्या साह्याने या चपला भारतात बनवल्या जातील, अशी तरतूद करण्यात आली आहे. हेही वाचा : जपानमध्ये पुन्हा ६.७ तीव्रतेचा भूकंप ; पॅसिफिक किनारपट्टीची त्सुनामीचा इशारा