Gurugram News | Lllegal party – एका फार्महाऊसमध्ये बेकायदेशीरपणे दारू आणि जुगार पार्टीवर छापा टाकत, १६ नायजेरियन नागरिकांसह १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्टीमध्ये परवान्याशिवाय दारू दिली जात होती, त्यापैकी काही जण जुगार खेळत होते. घटनास्थळावरून ५ लाख रुपये किमतीच्या महागड्या दारूचे, बिअरचे बॉक्स आणि ३.२० लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बेहलपा गावाजवळच्या एका फार्महाऊसमध्ये दारू पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने छापा टाकून नायजेरियन नागरिकांसह काही लोकांना दारू पिताना आणि जुगार खेळताना पकडले. हे सर्व परदेशी नागरिक दिल्ली आणि फरिदाबाद येथे राहत होते. जेव्हा त्यांना त्यांच्या परदेशी नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे दाखवण्यास सांगितले, तेव्हा ते व्हिसा किंवा पासपोर्ट दाखवू शकले नाहीत. परदेशी आरोपींना न्यायालयात हजर केले जाईल. पुढील तपास सुरू आहे आणि आम्ही फार्महाऊसच्या मालकाला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. चौकशीनंतर, अटक केलेल्या सर्व परदेशी आरोपींना हद्दपार केले जाईल, असे गुरुग्राम पोलिसांनी सांगितले.