पुणे – महापालिका निवडणूक प्रचाराचा जोर वाढला असून औंध-बोपोडी प्रभाग क्र. ८ मध्ये भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार सनी विनायक निम्हण यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. बोपोडी परिसरात त्यांनी आज पदयात्रेचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मतदारांकडून उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभाग क्र. ८ मधील भाजप-रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. गुरूवारी सकाळच्या वेळेत औंध येथील सानेवाडी आय.टी.आय रोड या परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. सायंकाळी बोपोडी मधील मानाजी बाग, भोईटे वस्ती परिसरातील प्रचार करण्यात आला. यावेळी मूलभूत विकास, पायाभूत सुविधा, वाहतूक, स्वच्छता आणि नागरी प्रश्नांवर भर देत उमेदवारांनी आपल्या भूमिकेची माहिती मतदारांना दिली. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत करत आपल्या समस्या मांडल्या तसेच प्रभागासाठी वेगवेगळी विकासकामे राबविण्याची मागणी केली, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्रभागाच्या सर्वांगीन विकासासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे निम्हण यांनी मतदारांशी बोलताना स्पष्ट केले.