पुणे : सध्या सुरू असलेली विकासकामे त्यांच्या दैनंदिन जीवनाला अधिक सोयीस्कर ठरत आहेत. येणाऱ्या काळातही अशाच प्रकारे विकासकामे सुरू राहावीत, अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक १ मधील खंडोबा माळ परिसरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टी प्रभाग १ चे उमेदवार अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे यांच्याकडे व्यक्त केली. महापालिका निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने टिंगरे यांनी यांच्यासह उमेदवार वंदना खांदवे, आश्विनी भंडारे व संगिता दांगट यांनी या भागातील मतदारांशी संवाद साधला. यावेळी खंडोबा माळ परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच परिसरातील मूलभूत सुविधा, विविध विकासकामे आणि सातत्याने नागरिकांशी होत असलेला संवाद यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आमच्या भागात प्रत्यक्ष काम होताना दिसत असल्याची भावना अनेक नागरिकांनी अनिल (बॉबी) वसंतराव टिंगरे यांच्याकडे व्यक्त केली. तसेच परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज आणि सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर महापालिकेच्या माध्यमातून या पुढेही सातत्याने लक्ष देण्यासाठी या विभागाच्या सर्वांगीन विकासासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे यावेळी उमेदवारांनी सांगितले.या भागातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.