PMC Election : महानगरपालिका निवडणुकीसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच शहरातील शंकर महाराज मठ-बिबवेवाडी, प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचार संवाद फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या फेरीला स्थानिक नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, याठिकाणी राष्ट्रवादीकडून गौरव गणेश घुले, प्रितम रमेश नागापुरे, अस्मिता विशाल शिंदे आणि रश्मी विक्रांत अमराळे यांच्या पॅनलला संधी देण्यात आली आहे. गौरव घुले यांच्यासह सर्वच उमेदवार हे गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. रविवारी सायंकाळी पुण्याई नगर येथील संवाद फेरीलाही मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी अभिजीत टेंभेकर, स्वप्नील बेल्हेकर, अतुल धनकवडे, विलास मोकाशी, रामभाऊ परदेशी, अनिल बाबर आणि पांचाळ इत्यादी उपस्थित होते. सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी इंदिरानगर येथे संवाद फेरीचे आयोजन केले होते. ही फेरी देखील उत्साही वातावरणात पार पडली. त्यावेळी तेथील नागरिकांनी चारही उमेदवारांचे स्वागत करत, ‘आम्ही तुमच्या सोबतच आहोत’ असा विश्वास दिला. यावेळी बंडू नलावडे, विजयराव मोहिते, दादा सांगळे आणि बी. एन. गायकवाड उपस्थित होते. समस्यांबाबत चर्चा करण्याची संधी राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण परिसरातील नागरिकांशी संवाद साधला आहे. परिसरातील कचरा व्यवस्थापन, रस्ते वाहतूक, सुरक्षितता आणि महिलांचे प्रश्न अशा विविध विषयांवर हे उमेदवार थेट नागरिकांशी चर्चा करत आहेत.