पुणे – कॅम्प भागातील मोदी कॉलनी, नाना पेठेतील पदमजी पार्क, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, तसेच कसबा आणि सोमवार पेठेतील विविध वस्त्या, सोसायट्या, वाडे अशा ठिकाणी प्रभाग क्रमांक २४ चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांनी घरोघरी भेट देत प्रचार केला. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पदयात्रा न काढता प्रत्यक्ष भेटीवर भर दिल्याने त्यांचे कौतुक होते आहे. भेटीसाठी निवडणुकीचे निमित्त असले तरी भाजपा, बिडकर आणि प्रभागातील इतर उमेदवार कायम तुमच्या सुख-दु:खात सोबत आहेत, असा विश्वास बिडकर यांनी दिला. प्रभाग २४ सह संपूर्ण शहरातून भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करत पुणे महापालिकेत भाजपाला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. कॅम्प भागातील मोदी कॉलनी येथील रहिवाशांशी बोलाताना प्रलंबित प्रश्न सोडविणार असल्याचे स्पष्ट केले. मंगळवार पेठेतील भीमनगरमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. प्रभागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोचवण्याचा आमचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. गणेश पेठ गुरुद्वारात अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झालेल्या ‘नगर कीर्तन यात्रे’त सहभागी होऊन बिडकर यांनी दर्शन घेतले. नाना पेठेतील सोसायट्यांमध्ये रहिवाशांच्या भेटी घेतल्या. रास्ता पेठ भागातील सोसायट्यांमधील रहिवाशांच्या भेटी घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदा आनंदनगर येथील फ्लॅटधारकांना औपचारिकरीत्या ‘शेअर सर्टिफिकेट’चे वाटप करण्यात आले.