Pathan 2 : अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा धुमाकूळ घातला. या चित्रपटाने मोठी कमाई करत अनेक चित्रपटांचे रेकॅार्ड मोडीत काढले. चित्रपटातील शाहरुखच्या पात्राचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर इतिहास रचत नवा रेकॅार्ड आपल्या नावे केला. त्यानंतर या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा होती. अखेर पठाण २ ची घोषणा करण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत पठाण २ ची घोषणा करण्यात आली आहे. दुबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पठाणच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमात शाहरुख खानच्या हस्ते एका टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्टेजवरून एका व्यक्तीने पठाण २ येणार असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हायरल व्हिडिओमध्ये रिअल इस्टेट डेव्हलपरने शाहरुखच्या नावाने बांधलेल्या टॉवरचा उल्लेख करत, ‘जर ब्लॉकबस्टर चित्रपट असेल तर त्याचा सिक्वेलही असतो.’ असे स्टेजवरून बांधकाम व्यावसायिकाने म्हटले. त्यामुळे पठाणच्या सिक्वल येणार असल्याची चर्चा रंगली आहे. PATHAAN is BACK 🔥😳 ALL TIME GROSSER & the HIGHEST GROSSER from the Spy Universe to gets SEQUEL – #Pathaan2 ❤️😎#ShahRukhKhan movie likely to start next year after #Alpha release 😱😎 After #Dhurandhar the expectations from Spy movies are SKY HIGH 🙏🏻pic.twitter.com/hbq26aDOgj — Pan India Review (@PanIndiaReview) December 9, 2025 ही चर्चा होत असली तरी अद्यापर्यंत चित्रपटाच्या टीमकडून सिक्वलबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असले तरी पठाणच्या सिक्वलच्या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. या कार्यक्रमात शाहरुखच्या प्रतिक्रियेनंतर चाहत्यांच्या ‘पठाण २’ बद्दलच्या आशा आणखी वाढल्या आहेत. हेही वाचा : चांदीने गाठला २ लाखांच्या जवळचा टप्पा ; तर सोन्याच्या किंमतीत घट, वाचा आजची किंमत