मुंबई : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून या निकालांमध्ये भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. मात्र या निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एमआयएमने महाराष्ट्रात मोठी झेप घेतली आहे. राज्यातील 29 पैकी 13 महानगरपालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल 95 उमेदवार विजयी झाले असून, यामुळे पक्षाचे स्थानिक राजकारणातील वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेतही एमआयएमने दमदार कामगिरी करत अनेक ठिकाणी विजय मिळवला आहे. मुंबईत एमआयएमची दमदार धडक एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभर प्रचारसभा घेतल्या होत्या. त्याचा थेट परिणाम मुंबईत दिसून आला असून, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मानखुर्द परिसरातही एमआयएमने विजय मिळवला आहे. यामुळे समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील एमआयएमचे विजयी उमेदवार वॉर्ड 134: मेहजबिन खान वॉर्ड 136: जमीर कुरेशी वॉर्ड 137: समीर पटेल वॉर्ड 138: रोशन शेख वॉर्ड 139: शबाना शेख वॉर्ड 145: खैरुनिसा हुसेन राज्यभरात एमआयएमची प्रभावी कामगिरी एमआयएमने महाराष्ट्रातील 13 महानगरपालिकांमध्ये एकूण 95 जागांवर विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजीनगर: 24 जागांवर विजय (पालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष) मालेगाव: 20 उमेदवार विजयी सोलापूर, धुळे, नांदेड: प्रत्येकी 8 उमेदवार, एकूण 24 अमरावती: 6 ठाणे: 5 नागपूर: 4 चंद्रपूर: एमआयएमने विजयाचे खाते उघडले या निकालांमुळे अनेक ठिकाणी समाजवादी पक्षाला मागे टाकत एमआयएमने आपले स्थान मजबूत केले आहे.