Dhananjay Munde : नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचारसभांमध्ये मोठे नेत्यांकडून जोरदार भाषणबाजी केली जात आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या प्रचारसभांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनेचा उल्लेख करत महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकत्याच बीड येथील एका सभेत बोलताना पर्यावरण मंत्री भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबत मोठं विधान केले होते. मी लाडकी बहीण योजनेसाठी आग्रही होते, असे विधान पकंजा मुंडे यांनी केले होते. त्यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अशातच आता माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात खळबळ बीड जिल्ह्यातही निवडणुकांची धामधूम सुरू असून, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंंडे यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. एका जाहीर सभेतून बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपरिषद निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आता फक्त माझं राजकारणच नाही तर मलाच संपायच्या मागे लागले आहेत, असे विधान धनंजय मुंडे यांनी केले आहे. ज्या लोकांनी परळीला बदनाम केले त्या लोकांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाल्या आहेत. परळीकरांना आर्त हाक त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यातून त्यांचा रोख कुणाकडे होता, अशी देखील चर्चा येथील स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तुमच्या प्रत्येक अडचणी ही माझी अडचण म्हणून मी सोडवली आहे. कोणतीही गडबड करू नका, अशी आर्त हाकही धनंजय मुंडे यांनी परळीकरांनी दिली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बरकतनगर भागात आयोजित सभेत ते बोलत होते. धनंजय मुंडे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जे वातावरण होतं, तेच वातावरण आता नगरपरिषद निवडणुकीच्या वेळेला आहे. मी माझी जबाबदारी या ठिकाणी नेहमीच बजावली आहे. नगरपरिषदेकडून मला आयटीआय सुरू करायचं आहे. यामुळे रोजगाराला मदत होईल, अशी घोषणाही धनंजय मुंडे यांनी केली आहे. तुम्ही माझ्या दरवाजात काम घेऊन आलात आणि तुम्ही रिकाम्या हाताने परत गेला, असं कधीच झालं नाही. आपले मत वाया जाऊ देऊ नका. नगरपरिषद निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे, असेही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. हेही वाचा : मोठी बातमी! ‘या’ तीन नगरपरिषदांची निवडणुक पुढे ढकलली; काय आहे कारण ?