Nashik Municipal Corporation Election : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत भाजपने स्वबळावर बहुमताचा जादुई आकडा ओलांडून नाशिकचा गड राखला आहे. नाशिक महापालिकेच्या एकूण १२२ जागांपैकी भाजपने ६६ जागांवर आघाडी घेत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. विजयासाठी आवश्यक असलेला ६२ हा जादुई आकडा भाजपने सहज पार केला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून, ते दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आले आहेत. नाशिकमध्ये येत्या काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विकासकामांच्या जोरावर मतदारांनी पुन्हा एकदा भाजपला कौल दिल्याचे चित्र आहे. नाशिकमध्ये कोण कोण जिंकलं? – नाशिकच्या प्रभाग 1 मध्ये भाजपचे 3 तर शिवसेना शिंदे गटाचे 1 उमेदवार विजयी – मंत्री गिरीश महाजनांचे दोन्ही निकटवर्तीय दिपाली गिते आणि रुपाली नन्नावरे विजयी – भाजपचे रंजना भानसी विजयी – ड्रग्सच्या आरोपावरून गाजलेल्या प्रभाग 24 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रविण तिदमे विजयी – भाजपच्या पल्लवी गणोरे विजयी – शिंदे शिवसेनेच्या डॉ. पूनम महाले विजयी – भाजपचे राजेंद्र महाले विजयी – मुस्लिम बहुल प्रभाग 14 मध्ये ३ काँग्रेस तर एक अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी – काँग्रेसचे नाझीया अत्तार, सामीया खान, सुफी जीन आणि अजित पवार राष्ट्रवादीचे जागृती गांगुर्डे विजयी – भाजपच्या चित्रा तांदळे विजयी – आमदार खोसकर यांनी निवडणूक केली होती प्रतिष्ठेची प्रभाग 4 : विजयी उमेदवार.. मोनिका हिरे- भाजप सरिता सोनवणे -भाजप सागर लामखेडे- भाजप हेमंत शेट्टी -भाजप प्रभाग 5 : विजयी उमेदवार… कमलेश बोडके -शिवसेना चंद्रकला धुमाळ-भाजप नीलम पाटील-भाजप गुर्मीत बग्गा-भाजप प्रभाग 6 : विजयी उमेदवार.. प्रमोद पालवे -शिवसेना शिंदे वाळू काकड -भाजप चित्रा तांदळे -भाजप रोहिणी पिंगळे -भाजप नाशिक महानगरपालिका : एकूण जागा – १२२ भाजप विजयी – ६६ शिंदेंची शिवसेना विजयी – २१ ठाकरेंची शिवसेना – ०८ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार – ०३ काँग्रेस – ०३ मनसे – ०१ अपक्ष – ०१ आघाडीवर : भाजप – १२ शिंदेंची शिवसेना – ०६ ठाकरेंची शिवसेना – ०१