बीड : माझ्या मुलीची हत्या झाली आहे, त्यानंतर ती आत्महत्या दाखवण्यात आल्याचा आरोप डॉ. गौरी पालवे यांच्या वडिलांनी केला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांचा खासगी पीए अनंत गर्जेच्या पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जे यांनी 23 नोव्हेंबर रोजी मुंबईत राहत्या घरात मृतदेह आढळला होता. गौरीने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. डॉ. पालवेचे वडील म्हणाले, दोन सहकाऱ्यांच्या मदतीने गौरीला मारण्यात आले आहे. गौरीच्या डोक्यावर आणि छातीवर मारल्याच्या खुना आहेत. मग स्पॉट पंचनामा करून ही आत्महत्या कशी काय ठरवली?असा प्रश्न तिच्या वडिलांनी केला. या प्रकरणातील इतर आरोपींना अटक करा. त्यांचा सीडीआर आम्हाला द्या, अशी मागणी गौरीच्या वडिलांनी केली. अनंत गर्जेच्यासह त्याचा भाऊ अजय गर्जे आणि बहीण शितल आंधळे यांची चौकशी करा. अनंत गर्जे त्याचे स्टेटमेंट वारंवार बदलत आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी. या प्रकरणात गुन्हेगारांची नार्कोटेस्ट, ब्रेन मॅपिंग करा. माझ्या मुलीची हत्या करण्यात आल्याचे ते म्हणाले. डॉ. गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी, पोलीस स्टेशनमध्ये अनंत गर्जेसह बहिण शीतल गर्जे आंधळे, दीर अजय गर्जेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, सासरकडून क्रूरतेची वागणूक देणे आणि धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.