Devendra Fadnavis : मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. काल मुंबई येथील वरळीतील भाजप आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित मेळाव्यातून महायुतीच्या प्रचाराचा पहिला नारळ फुटला. मुंबईचा महापौर कोण होणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावरून थेट घोषणा करत मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार असल्याचे मोठं विधान केले. तसेच यावेळी बोलताना फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत उबाठाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. मुंबई महापालिकेत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर झोंबणारी टीका केली. ही निवडणूक मुंबईकरांसाठी महत्वाची आहे देखील फडणवीस म्हणाले. नुकतेच मुंबईत ठाकरे बंधूंची पुढची पिढी आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे अमित ठाकरे यांनी त्यांची सत्ता मुंबईत आल्यावर काय काय बदल होतील याचे व्हीजन सादर केले. यावर फडणवीसांनी समाचार घेत मोठं घर त्याला देऊ आणि स्वप्न पूर्ण करु असेही ते म्हणाले. मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील लोकांना घर देऊ. महायुतीच्या सरकारने एसआरएच्या माध्यमातून घरं दिल्या, योजना आपल्या अजूनही सुरु आहेत. घरांचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत, असे फडणीस म्हणाले. पत्राचाळीचा तुम्ही घोटाळा केला. तिथल्या लोकांना बेघर केलं, असा आरोपही फडणवीसांनी ठाकरे गटावर केला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत राजकारण चांगलेच तापले आहे. राऊतांना खोचक टोला मुंबईचा महापौर महायुती, हिंदू आणि मराठीच होणार, पण परवा वारीस पठाण बोलून गेले बुरखेवाली मेयर बनेगी, मात्र सकाळचा भोंगा त्यावर बोलेना असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांना लगावला. हेही वाचा : Devendra Fadnavis: “हे काम म्हणजे जादूच..”; जयकुमार गोरेंच्या कामाचे फडणवीसांनी भरसभेत केले कौतुक