Rohit Pawar Tweet : आज राज्यातील २७ जुन्या आणि जालना आणि इंजलकरंजी या नवीन महापालिका अशा एकूण मिळून २९ महपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर जाऊन केलेल्या मतदानाची मतमोजणी केली जाणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रांवर मतदान सुरूच होते. अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर इव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला विलंब झाला. त्यामुळे मतदानाची एकूण टक्केवारी किती याबद्दल माहिती समोर आलेली नाही. केवळ अंदाजित मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही.. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी… — Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2026 यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवरून ट्वीट करत आयोगाच्या कारभारावर सवाल केला आहे. या सगळ्यावर त्यांनी एक वेगळा संशय व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी जाहीर करण्याचं टाळलं जात नाही ना? असा संशय रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. नेमकं काय म्हणाले राोहित पवार? “काही वेळातच मतमोजणीला सुरूवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही.. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी जाहीर करण्याचं टाळलं जात नाही ना? आता टक्केवारी जाहीर करायची की नाही हे निवडणूक आयोगाने ठरवावं, पण किमान आम्ही भाजपाची B-Team आहोत हे तरी मग जाहीर करावं!” हेही वाचा : मुंबईत ठाकरे बंधू की शिंदे-फडणवीसांची युती विजयी झेंडा फडकवणार? ; संपूर्ण देशाचे आजच्या निकालाकडे लक्ष