Manoj Tiwary slams Mary Kom : दिग्गज बॉक्सर मेरी कोम आणि तिचा माजी पती करुंग ऑनलर यांच्यातील वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या वादात आता भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने उडी घेतली आहे. मेरी कोमने आपल्या पतीबद्दल केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त करत मनोजने तिला आरसा दाखवला आहे. नेमका वाद काय? काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मेरी कोमने तिचा माजी पती करुंग ऑनलर याला ‘नाकर्ते’ (निकामी) म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना करुंगने मेरी कोमवर ज्युनियर खेळाडूंसोबत अफेअर असल्याचा खळबळजनक आरोप केला. या आरोप-प्रत्यारोपामुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मनोज तिवारीने व्यक्त केली खंत – मनोज तिवारीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मेरी कोमच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला,”मेरी कोम चॅम्पियन खेळाडू आहे, तिने देशाचे नाव रोशन केले आहे. पण तिने आपल्या माजी पतीबद्दल जे काही म्हटले, ते पाहून मला खूप दुःख झाले.” हेही वाचा – IND vs USA : भारताचा विजयी श्रीगणेशा! पावसाच्या लपंडावानंतर अमेरिकेला पाजलं पाणी; अभिज्ञान-हेनिल ठरले शिल्पकार मनोज तिवारी पुढे म्हणाला, “एकेकाळी मेरीनेच सांगितले होते की, तिच्या पतीचा तिला मोठा पाठिंबा होता, ते मुलांची काळजी घ्यायचे. आज नाते संपले म्हणून अशा प्रकारे सार्वजनिकरीत्या पतीचा अपमान करणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीचा असा अपमान झाल्यानंतर त्याच्या मानसिक स्थितीचा विचार करून मला भीती वाटते,” असेही मनोजने नमूद केले. मनोज तिवारीने पत्नीचे मानले आभार – हा विषय मांडताना मनोज तिवारीने स्वतःच्या पत्नीचे उदाहरण दिले. “नाते एकमेकांच्या साथीने चालते. माझ्या बाबतीत माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली आहे आणि मी तिचा आभारी आहे,” असे म्हणत त्याने ‘सपोर्ट सिस्टम’ म्हणून काम करणाऱ्या जोडीदारांचा सन्मान करण्याचे आवाहन केले. हेही वाचा – Mohammad Rizwan : रिझवानचा ‘रिटायर्ड आऊट’वरून अपमान? कामरान अकमल संतापला; म्हणाला, ‘बीबीएल सोडून परत ये!’ व्हिडीओ केला डिलीट – विशेष म्हणजे, मनोज तिवारीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर काही वेळातच तो डिलीट केला. मात्र, तोपर्यंत हा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यावर चर्चा सुरू झाली होती.