Pune District : रिंगणात हरपले भान; दुमदुमला विठुनामाचा छंद
Pune District : आल्हाददायक वातावरणात सुमारे दीड ते दोन लाखांच्या पायदळासह भागवत धर्माची पताका फडकावित माउलींच्या पालखी सोहळ्याने पालखी पहिल्या िंरगण सोहळ्यासाठी पुरंदावडेकडे कूच केली.

पंढरपूर : दि. २०- माउली… माउली… आणि हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल िंरगण पुरंदावडे येथे भक्तिमय वातावरणात पार पडले. माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल िंरगण याचि देही याचि डोळा अनुभवताना भाविक व वारकर्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
धावे अश्व माउलींचा ।
उधळे भक्तीचा गंध ।।
िंरगणात हरपले भान ।
दुमदुमला विठुनामाचा छंद ।।
या काव्यरचनेचा प्रत्यय आणून देणार्या सोहळ्यात टाळ-मृदंगांचा गजर आणि विठ्ठलनामाचा जयघोष झाला. नातेपुते येथे पहाटे पालखी सोहळाप्रमुख राजेंद्र उमाप यांच्या हस्ते माउलींची नैमित्तिक पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी ६.३० वाजता माउलींसह लाखो वैष्णवभक्तांनी नातेपुतेनगरीचा निरोप घेतला. आल्हाददायक वातावरणात सुमारे दीड ते दोन लाखांच्या पायदळासह भागवत धर्माची पताका फडकावित माउलींच्या पालखी सोहळ्याने पालखी पहिल्या िंरगण सोहळ्यासाठी पुरंदावडेकडे कूच केली.
दुपारचा नैवेद्य व विश्रांतीसाठी हा सोहळा सकाळी मांडवे ओढा येथे पोहोचला. येथे माउलींना दुपारचा नैवेद्य दाखविण्यात आला व वारकर्यांनी भोजन घेतले. भोजनानंतर सोहळा सदाशिवनगरकडे मार्गस्थ झाला. सदाशिवनगर येथे स्वागत करण्यात आले. दुपारी दोन वाजता सोहळा पुरंदावडे येथील मैदानावर रिंगण सोहळ्यासाठी पोहोचला. यावेळी अश्वांची पूजा करण्यात आली व अश्वांना रिंगणाचा मार्ग दाखवण्यात आला व पहिल्यांदा माउलींचा अश्व रिंगणात सोडण्यात आला व नंतर स्वाराचा अश्व रिंगणात सोडण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजता रिंगणाला सुरुवात झाली.
माउलींचा अश्व व स्वाराचा अश्व यांनी रिंगणाच्या तीन फेर्या मारल्या. यावेळी भाविकांनी माउली… माउली…चा गजर केला. या सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री शिवप्रसाद, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक-िंनबाळकर, माजी आमदार राम सातपुते, माजी सभापती अर्जुनिंसह मोहिते-पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, पुरंदावडेच्या सरपंच राणी मोहिते, उपसरपंच महादेव ढोपे, ग्रामसेवक सचिन बनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरंदावडे येथील प्रांगणात गोल रिंगणासाठी मैदान तयार करण्यात आले होते. िंरगणाचा तळ सुसज्ज केला होता. यावेळी िंरगणाच्या मध्यभागी व गोलाकार नेत्रदीपक रांगोळी काढली होती, तर अश्वांच्या िंरगणाच्या मार्गावर रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. सुरुवातीला रथापुढील १ ते २७ दिंड्या अश्वांसह रिंगणात आल्या. त्यापाठोपाठ माउलींची पालखी खांद्यावर घेऊन रिंगणात आणण्यात आली. रथापाठीमागील सुमारे २० िंदड्या िंरगण सोहळ्यासाठी आत आणण्यात आल्या. चोपदारांनी पताकाधारी वारकर्यांना िंरगणाच्या मध्यभागी घेतले. त्यानंतर िंरगणाला एक प्रदक्षिणा पूर्ण करून माउलींची पालखी रिंगणाच्या मधोमध उभारण्यात आलेल्या शामियानात आणण्यात आली.
भान हरपून खेळ खेळतो ।
दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा ।।
भक्तीने भरलेला रिंगण सोहळा ।
पहावा याचि देही याचि डोळा ।।
अश्वांची पूजा झाल्यानंतर जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर चोपदारांनी अश्वांना रिंगण दाखविले. त्यानंतर स्वाराचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्या पाठोपाठ माउलींचा अश्व धावला आणि लाखो भाविकांनी माउली… माउली… नामाचा जयघोष सुरू केला आणि या जयजयकारातच दोन्ही अश्वांनी नेत्रदीपक दौड करीत हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडला. दोन्ही अश्वांनी तीन फेर्या पूर्ण केल्या.
रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यां दिंड्यांमध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. िंरगणानंतर माउलींचा पालखी सोहळा येळीव फाटा येथे विश्रांती घेऊन माळशिरसकडे मार्गस्थ झाला. माळशिरस येथे नगरपंचायत तसेच नागरिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले.





