Janhvi Kapoor : बॅालीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत जान्हवी तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. मात्र, शिखर पहारियाने पापाराझींपासून अंतर राखताना दिसून आला आहे. दोघेही एका कार्यक्रमात एकत्र सहभागी झाले होते. पापाराझींना पोझ देताना फोटोसाठी जान्हवी आली. शिखरने ही गोष्ट टाळली असल्याने विविध चर्चा झडू लागल्या आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान करून जान्हवीने कार्यक्रमाला हजेरी लावली. तर शिखर पारंपारिक पोशाखात दिसला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पापाराझी फोटो काढत असताना शिखर आणि जान्हवी एकत्र सोबत चालत येतात. मात्र, जान्हवीला फोटोसाठी शिखर जाण्यास सांगताना दिसत आहे. त्यानंतर जान्हवी एकटी जावून पापाराझींना फोटोसाठी पोझ देते. दोघेही जान्हवी कपूरची जवळची मैत्रीण दिया श्रॉफच्या मेहंदी समारंभाला हजर होते. View this post on Instagram A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) दोघांनी अधिकृतपणे आपले नाते सार्जजनिकरित्या उघड केलेले नाही. पण त्यांची रिलेशनशिप जवळपास कन्फर्मच समजली जात आहे. शिखर हा बिझनेसमन आहे, पोलो प्लेयर आहे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. अलीकडेच नोव्हेंबर महिन्यात बोनी कपूरच्या 70 व्या वाढदिवसाच्या फॅमिली फोटोमध्ये शिखर जान्हवीच्या शेजारी उभा होता, त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. जान्हवी पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या “पेड्डी” या दक्षिण भारतीय चित्रपटातही काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती राम चरण याच्यासोबत झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वी जान्हवी कपूरचा “परम सुंदरी” हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर ती “सनी संस्कार की तुलसी कुमारी” मध्ये दिसली होती. हे दोन्ही चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फार काही कमाल करू शकले नाहीत. त्यामुळे जान्हवीच्या चाहत्यांना तिच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. हेही वाचा : Epstein Files : एपस्टीन फाईलमधून नवा खुलासा; बिल क्लिंटन, मायकल जॅक्सनसह अनेकांचे फोटो समोर