Abhenitri Juvi Chawla : अभिनेत्री जुही चावलाने तिचे पती आणि उद्योगपती जय मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारी एक खास पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने काही फोटोही शेअर केले आहेत. जुहीने शेअर केलेल्या पोस्टला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रेम मिळत आहे. जुही चावलाने तिचे पती जय मेहता तसेच कुटुंबासोबतचे काही सुंदर फोटो इंन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने एक गोड नोट देखील लिहिली आहे. ज्यामध्ये जुवी म्हणते, जय केवळ तिचा जीवनसाथीच नाही तर तिचा सर्वात चांगला मित्र देखील आहे. या पोस्टला चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टमध्ये जुवीने पतीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. काही फोटोंमध्ये दोघेही त्यांच्या मुलांसोबत दिसत आहेत. View this post on Instagram A post shared by Juhi Chawla Mehta (@iamjuhichawla) फोटो शेअर करताना जुहीने लिहिले, “तो आयुष्य भरभरून जगतो, खूप हसतो आणि सर्वांना सोबत घेऊन जातो. त्याच्यासारखा चांगला मित्र कोणीच नाही. मी स्वतः खूप भाग्यवान समजते. वाढदिवसाच्या शुभेच्छा, जय!” ही पोस्ट जुवीने इंन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर यावर चित्रपट निर्मात्या फराह खाननेही कमेंट करत जय मेहताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सोशल मीडिया वापरकर्तेही या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ही पोस्ट खूप गोड आहे,” तर दुसऱ्याने म्हटले, “जुही, ही खूप गोड आणि हृदयस्पर्शी आहे. जय मेहता यांना शुभेच्छा.” १९९६ मध्ये साध्या पद्धतीने अभिनेत्री जुही चावलाने उद्योगपती जय मेहता यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी जुही हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. जुही आणि जय यांना जान्हवी मेहता आणि अर्जुन मेहता दोन मुले आहेत. अलिकडच्या काळात जुही ‘द रेल्वे मॅन’, ‘शर्माजी नमकीन’ आणि ‘हुश हुश’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. आगामी काळात ती अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हेही वाचा : यादव कुटुंबात घटस्फोटाचा भूकंप ! “तिने माझं कुटुंब उद्ध्वस्त…” ; प्रतीक यादवने शेअर केली भावुक पोस्ट