Ishan Kishan Dropped IND vs NZ ODI Series : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बीसीसीआय (BCCI) निवड समितीने शनिवार, ३ जानेवारी रोजी या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात अनेक वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन झाले असले तरी, फॉर्मात असलेल्या इशान किशनला पुन्हा एकदा डच्चू देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कर्णधार शुबमन गिल आणि निवड समितीने घेतलेल्या एका निर्णयामुळे इशानचा पत्ता कट झाल्याची चर्चा आता रंगली आहे. इशानच्या जागी पंतला झुकते माप – इशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करून एकदिवसीय संघासाठी आपला दावा मजबूत केला होता. टी-२० विश्वचषक २०२६ च्या पार्श्वभूमीवर त्याला संधी मिळेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. मात्र, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार शुबमन गिल यांनी इशानऐवजी ऋषभ पंतला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, निवड समितीला ऋषभ पंतला सलग संधी देऊन त्याला संघात स्थिरावू द्यायचे आहे. कर्णधार शुबमन गिलनेही पंतच्या निवडीला पाठिंबा दिला आहे. लोकेश राहुलचा ‘बॅकअप’ यष्टीरक्षक म्हणून पंतला संघात ठेवण्यावर गिल आणि आगरकर यांचे एकमत झाले, ज्यामुळे इशान किशनला संधी नाकारण्यात आली. हेही वाचा – BCB Demand ICC : विश्वचषकाआधी क्रिकेट विश्वात खळबळ! भारताकडून सामने हिरावून घेण्याची बांगलादेशची मागणी मैत्रीपेक्षा कर्तव्याला महत्त्व; गिलचा इशानऐवजी पंतला पाठिंबा – इशान किशन आणि शुबमन गिल हे मैदानाबाहेर खूप चांगले मित्र मानले जातात. मात्र, संघाच्या निवडीवेळी गिलने मैत्री बाजूला सारून पंतच्या बाजूने आपली भूमिका मांडली. इशानने नुकत्याच झालेल्या ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्ये कर्नाटकविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. केरळविरुद्धच्या पुनरागमन सामन्यात त्याने २१ धावा केल्या. सातत्यपूर्ण कामगिरी करूनही त्याला वनडे संघात स्थान न मिळाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हेही वाचा – UP Warriorz Captain : यूपी वॉरियर्सचा मास्टरस्ट्रोक; दीप्ती शर्माला नव्हे, ऑस्ट्रेलियाच्या ‘लेडी पॉन्टिंग’ला बनवले कर्णधार! टी-२० मालिकेत संधी मिळणार का? निवड समितीने तूर्तास केवळ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या मालिकेनंतर उभयसंघात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. निवड समितीच्या बैठकीत इशानच्या नावावर चर्चा झाली असून त्याच्या कामगिरीवर समितीचे लक्ष आहे. त्यामुळे वनडेत डावलले गेलेल्या इशानला टी-२० मालिकेत संधी मिळते का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.