Nitin Gadkari – काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष दृष्टिकोनामुळे आणि त्यांच्या व्होट बँकेच्या राजकारणामुळे देशाला अजूनही समाजात हिंदू-मुस्लिम समस्या भेडसावत आहेत. धर्मनिरपेक्ष या इंग्रजी शब्दाचा हिंदी अर्थ सर्वधर्मभाव किंवा सर्वांसाठी न्याय, कोणाचेही तुष्टीकरण नाही, असा आहे, काँग्रेसने त्यांच्या विचारसरणीच्या आधारे वर्णन केल्यानुसार धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ नाही, असे प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उदय माहुरकर लिखित माय आयडिया ऑफ नेशन फर्स्ट: रिडिफाइनिंग अनलॉयड नॅशनॅलिझम या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी येथे आयोजित कार्यक्रमाला गडकरी संबोधित करत होते. गडकरी म्हणाले की, १९४७ नंतर काँग्रेसला देशावर राज्य करण्याची संधी मिळाली. त्यांच्या विचारसरणीच्या आधारे त्यांनी काही बीजे पेरली… स्वातंत्र्यानंतर विविध हिंदू-मुस्लिम समस्या उद्भवल्या. दुर्दैवाने, १९४७ नंतर राजकारणात धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत निर्माण झालेली समस्या आपल्याला अजूनही त्रास देत आहे. काँग्रेस पक्षाने व्होट बँकेच्या राजकारणाचा भाग म्हणून स्वीकारलेल्या धोरणांमुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. भूतकाळातील चुकांपासून शिकण्यासाठी आणि भविष्यात त्या पुन्हा होऊ नयेत याची खात्री करण्यासाठी इतिहास लक्षात ठेवणे आवश्यक आहे. यावेळी बोलताना गडकरी यांनी वाजपेयींचे शब्द पुन्हा सांगितले. वाजपेयी म्हणाले होते की, भारत हा केवळ एक जमिनीचा तुक्डा नाही. तो धर्मनिरपेक्ष देश आहे; होता आणि राहील. हे सर्व काही भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती आणि सनातन संस्कृतीमुळे घडत आहे. म्हणूनच आपण म्हणतो, जगाची भरभराट होवो. हिंदू विस्तारवादी नाहीत ! काॅंग्रेसवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत गडकरी म्हणाले, आम्ही कधीही माझे कल्याण होवो, माझे कुटुंब समृद्ध होवो असे म्हणत नाही. इतिहासात कोणत्याही हिंदू राजाने इतर लोकांच्या प्रार्थनास्थळांचा नाश केल्याची नोंद नाही. कारण ते आपल्या संस्कृतीत नाही, आपल्या अनुवंशशास्त्रात नाही… आपण हुकूमशाहीवादी किंवा विस्तारवादी नाही आहोत.