IND vs PAK cricket clashes in 2026 : भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे केवळ खेळ नसून ती चाहत्यांसाठी एक भावनिक लढत असते. सध्या दोन्ही देशांमधील राजकीय तणावामुळे हे संघ केवळ आयसीसी आणि आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या स्पर्धांमध्येच एकमेकांशी भिडतात. अशातच, २०२६ हे वर्ष क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. कारण या एकाच वर्षात भारत आणि पाकिस्तानचे पुरुष व महिला संघ दोन मोठ्या विश्वचषकांमध्ये आमनेसामने येणार आहेत. १. टी-२० वर्ल्ड कप २०२६: १५ फेब्रुवारीला कोलंबो गाजणार! भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. हा सामना आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियम कोलंबो येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सामन्याला सुरुवात होईल. यजमान म्हणून भारताने या स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे, तर पाकिस्तानने आयसीसी रँकिंगच्या जोरावर प्रवेश निश्चित केला आहे. २. महिला टी-२० वर्ल्ड कप: १४ जूनला इंग्लंडमध्ये थरार पुरुषांनंतर जून २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या महिला टी-२० वर्ल्ड कपमध्येही दोन्ही देशांचे संघ एकाच गटात आहेत. १४ जून २०२६ रोजी भारतीय महिला संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. महिला क्रिकेटचा इतिहास पाहता भारताचे पारडे जड दिसते. आतापर्यंत झालेल्या १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी भारताने १३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ ३ वेळाच यश मिळाले आहे. हेही वाचा – Virat Anushka : विराट-अनुष्काचे कुटुंबासोबत दुबईत ‘न्यू इयर सेलिब्रेशन’; हॉटेलच्या रुमचे एका दिवसाचे भाडे ऐकून व्हाल चकीत ३. अंडर-१९ वर्ल्ड कप: सेमीफायनल किंवा फायनलमध्ये शक्यता २०२६ च्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्येही दोन्ही संघ सहभागी होणार आहेत. मात्र, सुरुवातीला दोन्ही संघांना वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे साखळी फेरीत त्यांचा सामना होणार नाही, परंतु बाद फेरीत (उपांत्य किंवा अंतिम फेरी) हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येण्याची दाट शक्यता आहे.