Who Will Open With Rohit Sharma In Ranchi : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा श्रीगणेशा रांचीमध्ये होणार आहे. नियमित कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे बाहेर असल्याने, या मालिकेत केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहेत. राहुलसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? गिल आणि रोहितची यशस्वी जोडी तुटल्यामुळे त्यांची जागा भरणे सोपे नाही. या जागेसाठी सध्या यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात चुरस आहे. त्यामुळे संधी कोणाला मिळणार जाणून घेऊया. यशस्वी जैस्वालची कामगिरी – यशस्वी जैस्वालने वनडे क्रिकेटमध्ये फेब्रुवारी २०२५ मध्ये पदार्पण केले, पण त्याला फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत (फक्त १ वनडे, १५ धावा). मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. त्याने २५११ धावा करत ७ शतके आणि १३ अर्धशतके ठोकली आहेत. जैस्वालला वनडेत ओपनिंगची संधी मिळाल्यास, तो त्याचे नक्कीच सोने करु शकतो. ऋतुराज गायकवाडची कामगिरी – दुसरीकडे, ऋतुराज गायकवाडने जैस्वालच्या तुलनेत अधिक वनडे (६ सामने, ११५ धावा, १ अर्धशतक) खेळले आहेत आणि तो प्रदीर्घ काळानंतर वनडे संघात परतला आहे. तो मागील काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करत आहे. त्याची उत्तम तंत्र, संयम आणि स्ट्राइक रोटेट करण्याची क्षमता त्याला सलामीसाठी एक मजबूत दावेदार बनवते. हेही वाचा – IND vs SA : प्लेइंग इलेव्हनचा सस्पेन्स संपला! ऋषभ-ऋतुराजला मिळणार का संधी? केएल राहुलने केलं स्पष्ट टीम मॅनेजमेंटसमोर तीन पर्याय – केएल राहुल आणि टीम मॅनेजमेंटसमोर आता रोहित शर्मासोबतच्या सलामीच्या जागेसाठी तीन मुख्य शक्यता आहेत: 1. जैस्वालला ओपनिंग: जैस्वालला सलामीला आणि गायकवाडला मधल्या फळीत संधी. 2. गायकवाडला ओपनिंग: गायकवाड सलामीला, तर जैस्वालला बाहेर बसवणे. 3. दोघांना संधी: दोघांनाही प्लेइंग-११ मध्ये ठेवून सलामी आणि मधल्या फळीत बरोबरीने जबाबदारी देणे. हेही वाचा – IND vs SA : ‘आमच्यात सुधारणा हवी’; अश्विनच्या टीकेनंतर केएल राहुलची कबुली! मान्य केली टीम इंडियाची ‘ती’ कमजोरी रांची वनडेमध्ये रोहित शर्मासोबत कोणता फलंदाज उतरतो, हे केवळ या सामन्याचीच नव्हे, तर संपूर्ण मालिकेची दिशा ठरवेल. टीम मॅनेजमेंट खेळपट्टी आणि रणनीतीनुसार अंतिम निर्णय घेईल.