Devendra Fadnavis : मुंबईतील शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आयोजित सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले होते. राज यांनी जाहीर सभेतून व्हिडीओ दाखवत प्रसिद्ध उद्योगपती गौतमी अदानी यांचे प्रस्थ कशापद्धतीने देशात आणि महाराष्ट्रात वाढत चालले आहे हे सांगितले. राज यांनी आपल्या भाषणात “माझा उद्योजकांना विरोध नाही, पण फक्त एकाच उद्योजकाचा हे सगळं का दिले जात आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काल महायुतीची मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा पार पडली. या सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र डागले. राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतमी अदानी यांच्या बाबतीत उपस्थित केलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी “मी अदानींचा वकील नाही. राज ठाकरेंच्या टीकेला ते उत्तर देतीलच. मात्र, 2014 नंतर देशात फक्त गौतम अदानीच नव्हे तर अनेक उद्योग समूहांचा विकास झाला, त्यांचे उत्पन्न कैकपटीने वाढले, ” असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या प्रश्नाला दिले आहे. राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते? राज ठाकरे यांनी 2014 साली अदानींचे साम्राज्य काही मर्यादित ठिकाणी होते, मात्र 2025 पर्यंत अदांनींचे साम्राज्य हे संपूर्ण देशात पसरले याबाबत व्हिडीओ दाखवत सांगितले. हे फक्त 10 वर्षांतील आहे. जगात असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षात इतका श्रीमंत झाला, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या देशात इतके उद्योगपती असताना एकाच माणसाला सर्व गोष्टी दिल्या. सिमेंट, वीज दिल्या. सिमेंट उद्योगात अदानी कधी नव्हताच. आज देशातील दोन नंबरचा उद्योगपती आहे, असेही राज ठाकरे म्हणाले होते. फडणवीसांचे प्रत्युत्तर 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदानींची नेटवर्थ वाढली. मी काही अदानींचा वकील नाही. पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावाही फडणवीसांनी केला आहे. हेही वाचा : Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुनील ढोरे बिनविरोध