Farrhana Bhatt – अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनानंतर जगभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतातील काही शिया मुस्लिम समाजातूनही शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान, बिग बॉस 19 मध्ये झळकलेली अभिनेत्री फरहाना भट्ट (Farrhana Bhatt) हिने श्रद्धांजली व्यक्त केल्याने सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. फरहानाने ‘इन्स्टंट बॉलिवूड’शी संवाद साधताना खामेनेई यांना श्रद्धांजली अर्पण केली. ती म्हणाली की, “ते असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांना विसरणे शक्य नाही. अनेक लोकांसाठी ते प्रेरणास्थान होते.” या घटनेमुळे आपण भावनिक झाल्याचे आणि रात्रभर झोप लागली नसल्याचेही तिने सांगितले. Farrhana Bhatt मात्र तिच्या या विधानावर नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. काहींनी तिला संवेदनशील विषयावर बोलताना तथ्य जाणून घेण्याचा सल्ला दिला, तर काहींनी तिच्या वक्तव्यावर टीका करत हा विषय मानवतेशी संबंधित असल्याचे म्हटले. परिणामी सोशल मीडियावर समर्थक आणि विरोधक यांच्यात चर्चा रंगली आहे. Iran-Israel War: फरहाना भट्ट कोण आहे? (Farrhana Bhatt) भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि रिअॅलिटी शो व्यक्तिमत्त्व असून तिला Bigg Boss च्या 19व्या सीझनमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली. तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात Laila Majnu चित्रपटातून झाली असून, अलीकडे संगीतकार अमाल मलिक सोबत Yahin Guzar Du या म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून सामाजिक व धार्मिक विषयांवर मत व्यक्त केल्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सध्या तिच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, पुढील काळात ती यावर अधिक स्पष्टीकरण देणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.