Huma Qureshi : जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापाराझी कल्चरवर भाष्य करत पॅप्सला हिणवणारे विधान केले होते. त्यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, पाराराझींकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला आहे. यावर अनेक कलाकारांंनी आपली मतंही नोंदवली आहेत. नुकतेच जया बच्चन यांच्या विधानावर जेष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी भाष्य केल्यानंतर आता बॅालीवूडची आघाडीची अभिनेत्री हुमा कुरेशी हिने देखील आपले मत मांडले आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यासाठी आम्ही त्यांना स्वतः बोलावतो. ते आम्हाला प्रमोट करतात. यामुळे सर्व दोष पॅप्सना देणे योग्य नाही, असे स्पष्ट मत हुमा कुरेशीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मांडले. प्रश्न विचारणे योग्य आहे, पण एखादाच्या खाजगी गोष्टी विचाराल तर ते मला योग्य वाटणार नाही. एक मर्यादा असते जी पार करू नये, पण अनेकदा ते करतात, असेही पॅप्सविषयी हुमा म्हणाली. पुढे अभिनेत्री म्हणाली, जेव्हा कुठे स्पॉट होण्याची इच्छा असते, तेव्हा स्वतः कॉल करतो. सर्व ब्लेम त्यांच्यावर टाकू नये. जेव्हा मूड नसतो तेव्हा ते विनंती करतात आणि फोटोग्राफर्स आदर करतात, असेही हुमाने सांगितले. पापाराझी कल्चरवर भाष्य करताना जया बच्चन यांनी हे कोण लोक आहेत? टाइट पॅँन्ट घालून मोबाईल घेऊन फोटो काढतात. असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर एका कार्यक्रमात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी तुम्ही लोक पँन्टही चांगली घालता आणि शर्टही चांगला घालता. आम्ही तुमचा खूप कदर करतो, असे म्हटले होते. हेही वाचा : ‘सर्वात सुंदर गोष्टी तेव्हाच घडतात, जेव्हा…’; लोकप्रिय अभिनेत्रीचे ७ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक