पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदार प्रक्रिया पार पडत आहे. पुण्यासह राज्यातील सर्वच मतदान केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी येत आहेत. अनेक मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने मतदार राजाला मतदान करण्यासाठी विलंब होत असल्याचे समोर येत आहे. मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी देखील मतदान करण्यासाठी बाहेर पडत असून, मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. या सगळ्या धामधूमीत पुण्यात एक अजब प्रकार समोर आला असून, या प्रकाराची मोठी चर्चा होत आहे. एका पुरुष मतदाराच्या नावापुढे चक्क एका महिलाचा फोटो छापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदाराने हा दावा केला आहे. माझ्या नावापुढे बाईचा फोटो छापलाय, असे रविंद्र वसंत गावखेडकर या मतदाराने दावा केला आहे. ज्यावेळी रविंद्र हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले. त्यावेळी मतदानाच्या लिस्टमध्ये त्यांच्या नावापुढे त्यांच्या फोटोऐवजी महिलाचा फोटो प्रिंट करण्यात आला असल्याचे त्यांनी पाहिली. त्यानंतर रविंद्र यांनी याबाबत विचारणा केली असता, संबंधितांनी हात झटकत आम्हाला माहित नसल्याचे सांगितले. माझ्या नावासमोर बाईचा फोटो आहे. मी त्यांना म्हणालो की बाईचे नाव रवींद्र असेल का? तर ते म्हणाले आम्हाला सांगू नका! (काकांना विचारल की महिला परिचयाची आहे का? तर लाजले)#पुणेरीकाका #पुणे ❤️#निवडणूक 🥁#उत्सव_लोकशाहीचा pic.twitter.com/Gp3c1LPOsY — Omkar Wable (@omkarasks) January 15, 2026 आपल्या नावापुढे महिलेचा फोटो कसा याबाबत विचारणा रविंद्र यांनी केली. त्यांनी म्हटलं की, रविंद्र हे नाव महिलेचं नाव असेल का? संबंधित अधिकारी म्हणाले आम्हाला माहित नाही, असे रविंद्र वसंत गावखेडकर यांनी सांगितले. त्यानंतर त्यांची ओळख आधारकार्डद्वारे पटवण्यात आली आणि त्यांना मतदान करता आले. मात्र, या प्रकारामुळे पुन्हा एकदा मतदार यादीमध्ये असलेले नाव त्यामध्ये पुरुष मतदारापुढे महिलेचा फोटो समोर आल्याने निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. हेही वाचा : “यावेळी, गोळीचा नेम चुकणार नाही” ; इराणच्या सरकारी वाहिनीकडून डोनाल्ड ट्रम्प यांना थेट धमकी