मुंबई – सुमारे अडीच कोटी रुपयांच्या हेरॉईनसह एका महिलेसह दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली असून या प्रकरणी चौघांवर एनडीपीएस कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, पोलीसांनी बोरिवलीमध्ये साध्या वेशात पाळत ठेवून दोन संशयीतांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडे 123 ग्रॅम हेरॉईन सापडले. ज्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये होती. अशाच दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीसांनी पाळत ठेवून पती-पत्नी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोटी चार लाखांचे हेरॉईन, दोन मोबाइल व एक मिक्सर ग्राईंडर असा मुद्देमाल जप्त करण्यत आला. चौघांनाही न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.