Shahid Afridi Slams Gautam Gambhir : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हे एकमेकांवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. क्रिकेट खेळत असताना या दोन खेळाडूंमध्ये अनेकदा मैदानात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही हे दोघे सोशल मीडिया तसेच मुलाखतीतून एकमेकांवर टीका करत असतात. आता आफ्रिदीने पुन्हा एकदा गौतम गंभीरवर हल्ला चढवला आहे. रोहित आणि विराटला आफ्रिदीचे समर्थन – एका मुलाखतीत बोलताना शाहिद आफ्रिदीने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे समर्थन करत गौतम गंभीरला लक्ष्य केले. माजी पाकिस्तानी कर्णधार म्हणाला, “विराट आणि रोहित हे भारतीय फलंदाजीच्या फळीचा कणा आहेत, हे सत्य आहे. ज्या पद्धतीने त्यांनी नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत खेळ केला आहे, त्यावरुन ते २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकतात, यावर विश्वास ठेवता येतो.” आफ्रिदीने पुढे सांगितले की, “तुम्हाला या दोन स्टार खेळाडूंना जपून ठेवावे लागेल. जेव्हा भारत कोणत्याही कमकुवत संघाविरुद्ध खेळत असेल, तेव्हा तुम्ही काही नव्या खेळाडूंना संधी देऊ शकता आणि विराटसोबत रोहितला विश्रांती देऊ शकता.” हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्या पापाराझींवर संतापला! गर्लफ्रेंडचे आक्षेपार्ह फोटो काढल्याने व्यक्त केली नाराजी, पाहा VIDEO आफ्रिदीने गंभीरवर साधला निशाणा – गौतम गंभीरबद्दल बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला, “ज्या पद्धतीने गौतमने आपले काम सुरू केले, तेव्हा असे वाटत होते की, त्याला जे वाटते आणि जे तो बोलतो, तेच बरोबर आहे. पण काही काळानंतर हे सिद्ध झाले आहे की, तुम्ही नेहमीच बरोबर नसता.” आफ्रिदीने गंभीरच्या कामाच्या पद्धतीवर आणि दृष्टिकोनावर अप्रत्यक्षपणे टीका केली. रोहितने मोडला होता आफ्रिदीचा विश्वविक्रम – एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता, जो रोहित शर्माने आपल्या नावावर केला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान रोहितने हा विश्वविक्रम मोडला होता.यावर आफ्रिदीने मोठेपणा दाखवत प्रतिक्रिया दिली. हेही वाचा – IPL 2026 Auction : आयपीएल २०२६ च्या लिलावासाठी ३५० खेळाडूंची अंतिम यादी जाहीर! ‘या’ खेळाडूच्या एन्ट्रीने वेधलं लक्ष तो म्हणाला, “विक्रम मोडण्यासाठीच बनतात आणि हा विक्रमही आता मोडला आहे. मला आनंद आहे की, ज्या खेळाडूला मी नेहमीच पसंत केले आहे, त्याने हा विक्रम मोडला आहे. सर्वात जलद शतकाचा माझा विक्रम जवळपास १८ वर्षे टिकला, पण अखेरीस तो मोडला गेला. एक खेळाडू विक्रम करतो आणि दुसरा खेळाडू येऊन तो मोडतो, हेच क्रिकेट आहे.”