Raj Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय मनोमिलन अखेर सक्सेस झाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून दोघे भाऊ राजकीय युतीची घोषणा कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर युतीची करण्यात आली आहे. उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज २४ डिसेंबरला राज-उद्धव राजकीय युतीची घोषणा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज दोन्ही भाऊ पुन्हा एकदा एकत्र येत त्यांनी राजकीय युतीची घोषणा केली आहे. खरंतर ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा आज होईल, उद्या होईल असे म्हणून दिवस गेले. नेमकी युती का जाहीर केली जात नव्हती त्याचे कारण समोर आले आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून होत असलेल्या रस्सीखेच. त्यामुळे युतीची अधिकृत घोषणा केली जात नव्हती. आता पत्रकार परिषदेतून जागावाटपाबाबत माहिती मिळेल असे वाटत होते. मात्र याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. वरळी येथील एका हॅाटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत व्यासपीठावर स्थानपन्न झाले होते. अवघ्या दोन मिनिटातच राज ठाकरे यांनी आपलं बोलणं संपवलं. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी जागा वाटपावर आपण आज काहीच बोलणार नाही, जे काही आम्हाला बोलायचं आहे, ते पुढे जाहीर सभांमधून बोलू. असे म्हटले. त्यामुळे नेमक्या अधिकृत किती जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या आहेत. याची माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट १४५ ते १५० तर मनसे ६५ ते ७० जागा लढवण्याची शक्यता मुंबई महापालिकेसाठी आहे. राज ठाकरे काय म्हणाले? “सर्वाचं मन:पूर्वक स्वागत करतो. युतीबद्दल बाकी जे काही बोलायचं आहे. ते आम्ही जाहीर सभांमधून बोलू. काही दिवसांपूर्वी माझी एक मुलाखत झाली होती. त्यात मी म्हटलं होतं. कुठल्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्याच वाक्यापासून आमची एकत्र येण्याची सुरुवात झाली.” असे राज ठाकरे म्हणाले. सध्या महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहेत. त्यात आणखी दोन टोळ्या अॅड झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधील मुलं पळवतात, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला. जे निवडणुका लढवणार आहेत. त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. कधी आणि कुठे उमेदवारी भरायची त्यांना सांगितलं जाईल, असेही राज ठाकरे यांनी जाहीरपणे सांगितले. हेही वाचा : Pneumonia: हिवाळ्यात निमोनियाचा धोका वाढतो; लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधक उपाय जाणून घ्या