बॉबी देओलची कमेंट ठरली खास :
\nईशाच्या या पोस्टवर तिचा सावत्र भाऊ बॉबी देओलने ‘हृदयाचे (Heart) इमोजी’ पोस्ट करत आपले प्रेम व्यक्त केले. ईशानेही त्याला तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. देओल कुटुंबातील दोन पिढ्यांमधील हे नाते पाहून चाहते भावूक झाले आहेत. प्रकाश कौर (धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी) आणि हेमा मालिनी यांची मुले जरी वेगळ्या घरात राहत असली, तरी कठीण काळात ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
दु:खातही देओल कुटुंब एकवटले !
\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दोन वेगवेगळ्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु मुलांमधील नाते आजही घट्ट आहे. ईशा आणि अहाना यांचे सनी आणि बॉबी देओलशी असलेले सलोख्याचे संबंध अनेकदा दिसून आले आहेत. सनी देओलच्या ‘गदर २’ च्या वेळी ईशाने पुढाकार घेऊन स्क्रीनिंग आयोजित केले होते. आता वडिलांच्या निधनानंतरही ही भावंडे एकमेकांना आधार देताना दिसत आहेत.