Election 2026 – सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप सुरू असल्याच्या कारणातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन गटामध्ये वादावादीचा प्रकार घडला. यावेळी अजित पवार पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे आणि शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. आमदार इद्रिस नायकवडी यांचा मुलगा प्रभाग २० मधून निवडणूक लढवत असून त्यांच्याकडुन निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप शरद पवार पक्षाच्या उमेदवाराकडून करण्यात आला आहे. त्यानंतर मिरजेतल्या जवाहर चौक येथील आमदार इद्रिस नायकवडी यांच्या घरासमोर दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वादावादीचा प्रकार घडला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.