लातूर : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतशा अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. लातूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी राजकीय खेळी करत मास्टरस्ट्रोक टाकला आहे. एक नव्हे तर तब्बल ३८ अपक्ष उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ऐन लातूर महापालिका निवडणुकीच्या अगदी तोंडावर घडलेल्या या घडामोडीने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना शिंदे पक्षाने मोठी खेळी करत ३८ अपक्ष उमेदवारांना पक्षात प्रवेश देण्यामागाचे कारणही समोर आले आहे. एकाचवेळी भाजप आणि काँग्रेसला शह देण्यासाठी ही राजकीय खेळी खेळली असल्याची चर्चा आहे. आज संध्याकाळी मुंबईत शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश होणार आहे. लातूर महापालिका निवडणुकीत ७० जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजनची आघाडी झाली आहे. 65 जागेवर काँग्रेस तर ५ जागेवर वंचित बहुजन आघाडी लढणार आहे. शिवसेना शिंदे पक्षाने ११ जागांवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाने देखील 9 जागांवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत. MIM जे ९ उमेदवार आहे. त्यामुळे ही निवडणूक मोठ्या चुरशीची होणार असून, सर्वांचाच कस निवडणुकीसाठी लागणार आहे. कोण वरचढ ठरणार? २०१४ मध्ये लातूर महापालिकेत सत्तांतर झाले आणि काँग्रेसची सत्ता उलथवून टाकत येथे भाजपचा झेंडा फडकला. भाजपाचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 36 जागा जिंकत मोठा इतिहास रचत एकहाती सत्ता आपल्याकडे खेचून आणली. राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे आता होत असलेल्या लातूर महापालिका निवडणुकीत कोण वरचढ ठरणार हे पाहणे लागणार आहे. हेही वाचा : “तुमच्या घरातल्या लोकांना कोणी घरी बसवले ते आधी बघा,” आशिष शेलारांची राज ठाकरेंवर जहरी टीका