Amit Thackeray : महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून, ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर समीकरणांना वेगळीच कलाटणी मिळाल्याचं चित्र आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेनंतर मुंबईत जबरदस्त वातावरणनिर्मिती झाली आहे. या सभेनंतर भाजपकडून ठाकरे बंधूंवर जोरदार टीकेची झोड उठवण्यात आली असतानाच, आता मराठा मोर्चाने थेट ठाकरे बंधूंना पाठिंबा जाहीर केल्यामुळे राजकीय चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. दरम्यान, अश्यातच अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी ‘दोन भावांचा महापौर बसणार आणि तो मराठीच असणार’ असं विधान केलं आहे. अमित ठाकरे म्हणाले की, आदित्य नंतर मी बोलण योग्य नाही कारण तो माझा मोठा भाऊ आहे असे अमित ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईत सध्या वातावरण आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्याने जे वातावरण आहे ते वातावरण आयुष्यात केव्हा वातावरण बघितलं नव्हतं. जे सत्ताधाऱ्यांनी वातावरण केलं आहे ते देखील आयुष्यात बघितलं नव्हतं असे अमित ठाकरे म्हणाले. काय वाटेल ते करा पण दोन भावांचा महापौर बसणार आणि तो मराठीच असणार असे अमित ठाकरे म्हणाले.