मुंबई: अभिनेत्री नूपुर सनॉन आणि स्टेबिन बेन यांच्या उदयपूरमधील शाही लग्नानंतर मुंबईत एका जंगी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक तारकांनी हजेरी लावली, पण अभिनेत्री दिशा पाटनीच्या एन्ट्रीने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या. लाल सॅटिन ड्रेसमध्ये दिशाचा जलवा दिशाने या पार्टीसाठी ‘RAT & BOA’ ब्रँडचा ‘Lotus Slip Dress’ परिधान केला होता. लाल रंगाचा हा सॅटिन ड्रेस, मोकळे केस आणि हाय हील्समधील तिचा हा लूक अत्यंत धाडसी आणि ग्लॅमरस होता. या ड्रेसची किंमत जवळपास $५०० म्हणजेच भारतीय चलनानुसार ४५,१३२ रुपये इतकी आहे. आपल्या फॅशन स्टेटमेंटने दिशाने पुन्हा एकदा सिद्ध केले की, बोल्डनेसच्या बाबतीत तिला टक्कर देणे सोपे नाही. अभिनेत्रीचा हा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालत आहे. नेटकरी देखील दिशाच्या या हॉट लूकवर फिदा झाले आहेत. दरम्यान, या पार्टीत दिशाच्या लूकसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही मोठी चर्चा रंगली. गेल्या काही काळापासून दिशाचे नाव प्रसिद्ध गायक तलविंदर याच्याशी जोडले जात आहे. नूपुरच्या लग्नापासून ते रिसेप्शनपर्यंत हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, कॅमेऱ्यासमोर एकत्र येणे टाळून त्यांनी आपल्या नात्याभोवती एक प्रकारचे रहस्य निर्माण केले आहे. या ‘ल्युका-छुपी’मुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या डेटिंगच्या चर्चा अधिकच तीव्र झाल्या आहेत. तलविंदर हा एक इंडो-कॅनेडियन गायक, गीतकार आणि संगीतकार आहे. तो त्याच्या हटके संगीत शैलीसाठी ओळखला जातो. तलविंदर हा अनेकदा मास्क लावून किंवा चेहरा अर्धवट झाकून परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखला जातो, ज्यामुळे त्याच्याबद्दल नेहमीच एक उत्सुकता असते. अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, दिशा शेवटची शिवा दिग्दर्शित तमिळ भाषेतील एपिक फॅंटसी अॅक्शन चित्रपट ‘कंगुवा’मध्ये दिसली होती. लवकरच ती ‘वेलकम टू द जंगल’,’ओ रोमिओ’ या सिनेमांमध्ये दिसणार आहे. तर कार्तिक आर्यनच्या ‘तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी’ सिनेमातील ‘तेनु जादा मोहोब्बत’ गाणं तलविंदरचं आहे.