Uddhav Thackeray : महापालिका निवडणुकीनंतर महापौर मदावरून मुंबईत मोठे घमासान पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणूक लढवली. निकालानंतर भाजपचे संख्याबळ ८९ असून शिदेंच्या शिवसेनेला केवळ २९ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तरी देखील एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित नगरसेवक फुटू नयेत यासाठी हॅाटेल पॅालिटिक्सची मोठी खेळी केली आहे. त्याचबरोबर दुसरी अशीही चर्चा आहे की, शिंदे अडीच वर्ष महापौर पद मिळावे यासाठी अडून बसले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना राजकीय वर्तुळात उत आला आहे. एका दैनिकात छापून आलेल्या बातमीच्या हवाल्यानुसार उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणी सुरू झाल्याची चर्चा रंगली होती. अखेर स्वतः उद्धव ठाकरे यांनी या चर्चांवर खुलासा केला आहे. अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या प्रकारच्या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महापौर निवडीमध्ये ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. गैरहजर राहून भाजपला सोयीस्कर भूमिका घेणार असल्याची चर्चा होती. तसेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बोलणी सुरू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्या बातम्या वृत्तपत्रांमधील आहेत. आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. महापौर कोणाला करायचं हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शिंदे आणि फडणवीस या दोघांची महापौर पदावरून चाललेली रस्सीखेच माध्यमांमध्ये रंगत आहे. यात दोघांनीही ठाकरेंना मध्ये ओढण्याचे कारण नाही, असे म्हटले आहे. पुढे काय होणार? दरम्यान, मुंबईचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हॅाटेल पॅालिटिक्सचा वापर करत सेनेच्या २९ नगरसेवकांना हॅाटेलमध्ये ठेवल्याने चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वतः शिंदेंनी प्रतिक्रिया देत निवडून आलेले अनेकजण नवखे आहेत, त्यांच्याशी ओळख व्हावी. सभागृहातील कामकाज आणि इतर गोष्टींसाठी त्यांच्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर नक्की कुणाचा ठरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा : नितीन नबीन यांच्या नामांकनापासून ते भाजपच्या अध्यक्ष निवड प्रकियेपर्यंत… ; पुढील २४ तासांत काय-काय घडणार? वाचा