Dhurandhar Box Office Collection : सध्या बॅाक्स अॅाफिसवर ‘धुरंधर’ या चित्रपटाची हवा आहे. ५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर मोठी कमाई केली आहे. पाच दिवसांत चित्रपटाने कोणत्याही चित्रपटाचा बॅाक्स अॅाफिसचा रेकॅार्ड मोडला नसला तरी चित्रपटाची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे. अभिनेता रणवीर सिंहच्या कारकीर्दीतील बिग बजेट चित्रपटांपैकी धुरंधर हा एक चित्रपट आहे. लवकरच हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर २०० कोटींची कमाई करणार असल्याचे समोर आलेल्या बॅाक्स अॅाफिसच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मागच्या पाच दिवसांत चित्रपटाने १५२.७५ कोटींची कमाई केली आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. रणवीर सिंह या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, चित्रपटातील इतरही पात्रांच्या लक्ष वेधून घेणाऱ्या भूमिका आहेत. विशेषकरून अभिनेता अक्षय खन्ना याने साकारलेल्या भूमिकेविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. चित्रपटाने पहिल्याच ओपनिंग डे दिवशी २८ कोटींची कमाई केली असून, Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, पाचव्या दिवशी धुरंधरने २६.५० कोटी रुपये कमावले आहेत. तर परदेशातही धुरंधरने चांगले बॅाक्स अॅाफिस कलेक्शन केले असून ४२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसह संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हेही वाचा : “मी एका फोन कॉलने हे युद्ध थांबवेन” ; थायलंड-कंबोडिया युद्धाविषयी ट्रम्पचा आणखी एक मोठा दावा