बीड : धनंजय मुंडे यांनी माझी 2.5 कोटींची सुपारी दिली होती. याबाबत तीन आरोपींनी कबुली दिली आहे. धनंजय मुंडे यांची चौकशी करा, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. सत्तेचा माज आहे. त्यामुळे चौकशी करत नाहीत. सत्ता गेल्यावर सोडणार नाही. तुमची सत्ता मराठा घालवणार असल्याची टीका जरांगे यांनी यावेळी केली. माझ्या घातपातामध्ये त्यांना क्लीन चिट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडल्याने मिळाल्याचे जरांगे म्हणाले. नार्को टेस्टसाठी मी तयार आहे. मी सगळ्यात आधी अर्ज केला आहे. मी पोलीस संरक्षण सुध्दा घेतले नाही. मला पोलीस नको ते म्हणाले. धनंजय मुंडे यांनी माझी सुपारी दिली होती. तीन आरोपींनी धनंजय मुंडेंचे नाव घेतले असेल तर त्यांना अटक करा. आमच्या दोघांची नार्को टेस्ट करा असे जरांगे म्हणाले. बाकीचे सावध राहिल्याने पुढे गेले. आपण बेसावध राहिल्यामुळे आपला कार्यक्रम झाला. श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला दाद देत नसल्याने मी गरीब मराठ्यांसाठी आंदोलनात उतरलो. मला अनेक प्रलोभने आली पण भुललो नाही. 70 वर्षात मुंबई बंद पाडण्याची ताकद मराठ्यांमध्ये आहे. सत्ता, पक्ष येत जात राहतील, पण आपल्याला एकजुटीने लढायचे आहे. एकजूट तुटून द्यायची नाही. एकमेकांसाठी धावून गेलो तरच वाचू, बाकी सगळे आपल्या विरोधात आहेत. मराठ्यांनो दारु पिवू नका. दारु पित असाल तर सोडा. दारु पिणारांची भाकरी बायकांनी बंद करावी. शिक्षण महाग झाले आहे. आरक्षणामुळे फी कमी होणार आहे. सरकारी नोकरीत तरुणांना संधी मिळणार आहे. केंद्राच्या सर्व योजना लागू होणार आहेत. आपला समाज व्यावसायिक झाला पाहिजे. मराठवाड्यातील सर्व मराठा ओबीसी आरक्षणात जाणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील चारही गॅजेट लागू होतील. यामुळे कोकणाला फायदा होणार असल्याचे ते म्हणाले.