DGP R.Rao suspended। सोन्याच्या तस्करीतील आरोपी अभिनेयत्री राण्या रावचे वडील आणि डीजीपी रामचंद्र राव यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. राव यांचे त्यांच्या कार्यालयातील आक्षेपार्ह वर्तन करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणामुळे कर्नाटकात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. सोमवारी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या, ज्यामध्ये रामचंद्र राव विविध महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत होते. या व्हिडिओंमुळे प्रशासन आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राज्य सरकारने राव यांना तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे रामचंद्र राव यांनी सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. तसेच हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि खोटे असल्याचे म्हटले आहे. व्हायरल व्हिडिओंनंतर राव यांची गृहमंत्र्यांशी भेट DGP R.Rao suspended। कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानाबाहेर माध्यमांशी बोलताना राव यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी, “मला पूर्णपणे धक्का बसला आहे. हे व्हिडिओ बनावट आहेत. माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही.” असे त्यांनी म्हटले. तसेच “आजकाल कोणालाही बनावट व्हिडिओ बनवता येतो आणि त्यांची प्रतिमा खराब करण्याचा हा कट असू शकतो” असेही त्यांनी म्हटले. आठ वर्षे जुना व्हिडिओ DGP R.Rao suspended। समोर आलेल्या वृत्तानुसार, हे व्हिडिओ जुने असू शकतात का असे विचारले असता रामचंद्र राव यांनी, “जर आपण जुन्या व्हिडिओंबद्दल बोललो तर ते सुमारे आठ वर्षांपूर्वीचे होते, जेव्हा ते बेळगावमध्ये तैनात होते. मात्र, त्यांनी पुन्हा सांगितले की त्यांचा या व्हिडिओंशी कोणताही संबंध नव्हता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, राव यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झाले नाहीत. सरकारने सूचित केले आहे की संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि तपास अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, “आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. कोणीही कायद्यापेक्षा वर नाही, ते कोणत्याही पदावर असले तरी. आम्ही चौकशी करू आणि नंतर पुढील कारवाई करू.” रामचंद्र राव अभिनेत्री राण्या रावचे वडील आयपीएस रामचंद्र राव हे अभिनेत्री राण्या रावचे वडील आहेत. राण्याला कर्नाटकातील सर्वात मोठ्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. मार्च २०२५ मध्ये, दुबईच्या सहलीवरून परतत असताना तिला अटक करण्यात आली आणि तिच्याकडून अंदाजे १२.५६ कोटी रुपयांचे १४.८ किलो सोन्याचे बार जप्त करण्यात आले. तिच्या अटकेनंतर, एजन्सींनी बेंगळुरूमधील लोवेल रोडवरील तिच्या निवासस्थानी छापा टाकला आणि त्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळली.