Prashant Jagtap : पुण्यात भाजपची यशस्वी घौडदोड सुरू असतानाच काँग्रेसला पहिला विजय मिळला आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक १८ मधून ते विजयी झाले आहेत. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेले होते. त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी केला पराभव केला आहे. प्रशांत जगताप यांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसने खातं उघडले आहे. प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला आहे. प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. अत्यंत अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप विजयी झाले आहेत. महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.