Mamata Banerjee – रोजगार हमीसाठी गाजलेल्या मनरेगाचे नाव का बदलण्यात आले? सध्याच्या केंद्र सरकारला महात्मा गांधींची एलर्जी असावे, असे दिसते. जर केंद्र सरकार राष्ट्रपित्याचा आदर करू शकत नसतील तर आम्ही करू. आम्ही आमच्या ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव कर्मश्री असे ठेवू, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला संताप व्यक्त केला. व्यवसाय आणि उद्योग परिषदेत बॅनर्जी यांनी भाजपचे थेट नाव न घेता म्हटले की, जर काही राजकीय पक्ष आपल्या राष्ट्रीय चिन्हांचा आदर करण्यात अपयशी ठरले तर आम्ही त्यांचा आदर करू. मला लाज वाटते की त्यांनी नरेगा कार्यक्रमातून महात्मा गांधींचे नाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आपण आता राष्ट्रपिता यांनाही विसरत आहोत. कर्मश्री योजनेअंतर्गत, सरकार लाभार्थ्यांना ७५ दिवसांचे काम देण्याचा दावा केला आहे. केंद्र सरकार मनरेगा अंतर्गत निधी रोखत आहे, हेही आम्हाला दिसून आले आहे. बॅनर्जी म्हणाल्या की, भविष्यात कर्मश्री अंतर्गत कामाच्या दिवसांची संख्या १०० पर्यंत वाढवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही कर्मश्री अंतर्गत आधीच अनेक कामाचे दिवस तयार केले आहेत, जे आम्ही आमच्या स्वतःच्या संसाधनांनी चालवत आहोत. जरी केंद्रीय निधी बंद झाला तरी आम्ही लोकांना काम मिळेल याची खात्री करू. आम्ही भिकारी नाही आहोत. काही लोक फक्त बंगालला बदनाम करू इच्छितात, परंतु त्यांना हे कळत नाही की बंगाल पूर्णपणे बदलला आहे. ते आता जागतिक दर्जाचे ठिकाण बनले आहे. उद्योग चालवणाऱ्या उद्योगपतींच्या वचनबद्धतेचा मी आदर करते. राज्यातही एसआयआर लागू केला जात आहे. आज, पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वात मोठ्या लॉजिस्टिक्स हबपैकी एक आहे. जागतिक बँक लॉजिस्टिक्स आणि निर्यात वाढीसाठी राज्यासोबत भागीदारी करत आहे. म्हणूनच आम्ही एमेझाॅनसारख्या जागतिक दिग्गजांना आकर्षित करत आहोत. – ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री