Shreyas Iyer present at IPL 2026 mini auction table : आयपीएल २०२६ (IPL 2026) हंगामासाठी खेळाडूंचा मिनी ऑक्शन सोहळा १६ डिसेंबर रोजी अबु धाबी येथील एतिहाद एरीनामध्ये पार पडणार आहे. या मिनी ऑक्शनला खास बनवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हा यावेळी पहिल्यांदाच ऑक्शन टेबलवर बसलेला दिसू शकतो. क्रिकबझच्या अहवालानुसार, दुखापतीमुळे सध्या टीम इंडियातून बाहेर असलेला अय्यर ऑक्शनमध्ये पंजाब किंग्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याने आणि संघाला त्यांच्या मुख्य प्रशिक्षकाशिवाय ऑक्शनमध्ये उतरावे लागत असल्याने, अय्यरला ही संधी मिळण्याची शक्यता आहे. रिकी पॉन्टिंगच्या अनुपस्थितीमुळे संधी – श्रेयस अय्यर ऑक्शनमध्ये सहभागी होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांची अनुपस्थिती. पॉन्टिंग सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेतील समालोचन पॅनेलचा भाग आहेत. ते सेव्हन क्रिकेट या ब्रॉडकास्टरशी जोडलेले असल्याने ते या मिनी ऑक्शनमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. हेही वाचा – Naseem Shah : ‘चहा प्यायला चल…!’ पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या मराठीने वेधलं लक्ष, VIDEO होतोय व्हायरल तसेच, पंजाब किंग्सला या ऑक्शनमध्ये फक्त चार खेळाडू खरेदी करायचे असल्याने, पॉन्टिंग यांना या लिलावातून विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून अय्यर ऑक्शनच्या रणनीतीमध्ये सहभागी होऊ शकतो. अय्यरची दुखापत आणि पुनरागमन – श्रेयस अय्यर गेल्या दीड महिन्यापासून क्रिकेटपासून दूर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेत कॅच घेताना त्याला दुखापत झाली होती. त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली होती, ज्यामुळे शरीराच्या आत रक्तस्राव झाला. यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो सध्या पुनर्वसन (रिहॅबिलिटेशन) प्रक्रियेतून जात आहे. जानेवारी २०२६ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून तो पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. हेही वाचा – PAK vs AUS : इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर ऑस्ट्रेलिया सतर्क! लाहोरमध्ये सुरक्षा तपासणी सुरू यापूर्वीही काही कर्णधार किंवा महत्त्वाचे खेळाडू ऑक्शन टेबलचा भाग बनले आहेत. २०२० च्या लिलावामध्ये दुखापतीमुळे संपूर्ण सीजन बाहेर असलेला ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सच्या ऑक्शन टेबलवर दिसला होता.