Breaking News : भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युती फिस्कटली आहे. मनसेसाठी ठरवण्यात आलेल्या दहा जागांपैकी चार वॉर्डांमध्ये ठाकरेसेनेने थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला होता. वार्ड क्रमांक ६-अ, १३-अ, ११-ड आणि १७-ड या प्रभागांमध्ये ठाकरेसेनेने उमेदवार उभे केल्यामुळे मनसेमध्ये मोठी नाराजी पसरली. अर्ज माघारीच्या टप्प्यात दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली असली तरी तोडगा न निघाल्याने मनसेने आपले 10 पैकी 8 उमेदवार अर्ज माघारी घेतले आहे. युतीधर्म पाळला गेला नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत असून, या प्रकारामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. वरिष्ठ पातळीवर पुढील भूमिका स्पष्ट होईल. परंतु, स्थानिक पातळीवर ठाकरेसेनेच्या भूमिकेवर मनसेमध्ये मोठी नाराजी आहे.