Mumbai Municipal Corporation Results। देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आले असून, भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपने १०० जागांचा टप्पा पार केला आहे. या जबरदस्त कामगिरीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आणि मनसे यांच्या ‘युतीला’ला मोठा धक्का बसल्याचे प्राथमिक कलांमधून दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. यावेळी मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. प्रचारादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप झाले, अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र, आता हाती येत असलेल्या कलांनुसार, मुंबईकरांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे. तर, मुंबईतील आतापर्यंत ठाकरेंचे किती उमेदवार विजयी झाले यावर देखील एक नजर टाकुयात… मुंबईतील आतापर्यंत ठाकरेंचे किती उमेदवार विजयी झाले : 207 रोहिदास लोखंडे – भाजपा 165 अश्रफ आझमी – काँग्रेस 33 मोईन सिद्दिकी – काँग्रेस 2 तेजस्वी घोसाळकर – भाजपा 135 नवनाथ बन – विजयी 1 रेखा यादव – शिवसेना शिंदे 1 रेखा यादव – शिवसेना शिंदे 215 संतोष ढोले – भाजपा 214 भाजपाचे – अजय पाटील 19 प्रकाश तावडे – भाजपा 50 विक्रम राजपूत – भाजपा 50 विक्रम राजपूत – भाजपा 123 सुनिल मोरे – शिवसेना ठाकरे 20 दीपक तावडे – भाजपा 207 रोहिदास लोखंडे – भाजपा 124 सकिना शेख शिवसेना – ठाकरेसेना 32 गीता भंडारी – शिवसेना ठाकरे 182 मिलिंद वैद्य – शिवसेना ठाकरे 87 पूजा महाडेश्वर – शिवसेना ठाकरे 73 लोना रावत – शिवसेना ठाकरे 145 खैरुनिसा हुसेन – एम आय एम 103 हेतल गाला – भाजपा 172 राजश्री शिरवाडकर – भाजप 33 अस्लम शेख यांची बहीण विजयी , काँग्रेस 9 शिवानंद शेट्टी – भाजपा 52 प्रीती साटम भाजप 37 योगिता कदम – ठाकरे सेना 134 मेहजबीन खान – एमआयएम 173 शिल्पा केळुस्कर – भाजप 104 प्रकाश गंगाधरे – भाजप 53 जितेंद्र वळवी – ठाकरे सेना 200 उर्मिला पांचाळ – ठाकरे सेना 59 फणसे – ठाकरे सेना