BMC Election Result । Municipal Election Result | राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. निकालानंतर आता राज्याच्या राजकारणावरील सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. विशेषत: सत्ताधारी महायुतीचे नेतृत्व करणाऱ्या भाजपचे राजकीय स्थान आणखी भक्कम बनले. प्रमुख शहरांचा कारभार हाती येणार असल्याने महापालिका निवडणुकांना मोठे महत्व प्राप्त झाले. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे. दरम्यान, अश्यातच महापालिका निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते नितेश राणे यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन महायुतीला निवडून दिलं. मुंबईचा महापौर हा हिंदूच होईल’ असं राणे म्हणाले. जय श्रीराम म्हणत लवकरच महायुतीचा महापौर हा महापौरच्या खुर्चीवर बसेल असा वक्तव्य राणे यांनी केलंय. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील २९ महानगर पालिकांमध्ये कोणाच्या किती जागा? भाजप – १४२५ शिवसेना (शिंदे) – ३९९ काँग्रेस – ३२४ राष्ट्रवादी अजित पवार गट – १६७ शिवसेना ठाकरे गट – १५५ राष्ट्रवादी शरद पवार गट – ३६ मनसे – १३ बहुजन समाजवादी पार्टी -६ एमआयएमचे – १२५