BMC Election – भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुंबईतील पेचाची दखल घेतल्याची माहिती पुढे येत आहे. महापौर पदाविषयी कुठली तडजोड न करण्याची पक्ष नेतृत्वाची ठाम भूमिका असल्याचे समजते. संख्याबळात सर्वांत मोठा पक्ष ठरल्याने महापौर पदावर आपलाच हक्क आहे. ती बाब मित्रपक्षापर्यंत योग्य प्रकारे पोहचवा. मात्र, राजकीय कटूता टाळा, असा स्पष्ट संदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मुंबईत आपलाच महापौर असेल अशी खूणगाठ भाजपने बांधली आहे. आता महापौर निश्चिती एवढीच केवळ औपचारिकता उरली आहे. ती प्रक्रिया चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल, असे संकेत भाजपच्या गोटातून देण्यात आले आहेत. ‘मुंबईचा महापौर दिल्लीत ठरवला जात आहे” – संजय राऊत सत्ताधारी पक्ष आपल्या आणि शिवसेनेच्या नगरसेवंकाचे फोन टॅप करत आहे आणि भाजपच्या नगरसेवकांवर त्याच पक्षाचे कार्यकर्ते पाळत ठेवत आहेत, असा दावा ठाकरेसेना पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. भाजपने राऊत यांचे आरोप फेटाळून लावत, पक्ष आपल्या नगरसेवकांवर विश्वास ठेवत असल्याने असे प्रकार करत नसल्याचे म्हटले आहे. राऊत यांनी दावा केला की, मुंबईचा महापौर दिल्लीत ठरवला जात आहे, जो महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेवर टीका केली. भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या प्रत्येक नगरसेवकाच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. भाजप स्वतःच्याच नगरसेवकांचे फोनही टॅप करत आहे. असं म्हंटलं आहे.