Mumbai Municipal Corporation Election : राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून, सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मुंबईत सकाळपासूनच लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होत मुंबईकर मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडत मतदान केंद्रावर येत असल्याने रांगा लागल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुबार मतदारावर लक्ष ठेवण्याचे आवाहन मनसैनिकांना केले होते. आता त पहिला दुबार मतदार सापडला असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये मुंबईतील पहिला दुबार मतदार आढळून आला आहे. दुबार मतदाराबाबत ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेत जर दुबार मतदार मतदान केंद्रावर दिसल्यास तिथेच ठोकून काढा असे आदेश दिले होते. आता पहिला दुबार मतदार सापडल्याने पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारडून मतदार केंद्रावर मतदान करण्यासाठी ओळखपत्र दाखवावे लागते, त्यानंतर मतदाराला मतदान करता येते. मात्र, असे असतानाही दुबार मतदार मतदान करण्यासाठी कसा आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्या वार्डमध्ये दुबार मतदार आढळून आला आहे, त्या वार्ड क्रमांक १९२ मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच वार्डात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजाविला. यशवंत किल्लेदार मतदान करण्यासाठी आले असता मतदान केंद्रावर दुबार मतदार आढळून आला आहे. दुबार यादीत असलेल्या महिला मतदाराला थांबविण्यात आले आहे. त्यांचे आधारकार्ड पाहून त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेऊन त्यांना मतदान करून दिले जाणार आहे. यावर ही सगळी निवडणूक आयोगाची चूक असल्याचा आरोप यशवंत किल्लेदार यांनी केला आहे. या वॅार्डात यशवंत किल्लेदार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे पक्षाच्या प्रीती पाटणकर रिंगणात आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकूण १७०० उमेदवार आपले नशीब आजमत आहेत. त्यापैकी पुरुष मतदार ८२२ असून, महिला उमेदवार ८७८ आहेत. मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी ६४ हजार ३७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हेही वाचा : ३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज ‘महामतदान’, राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान आणि इराणची ट्रम्पला जीवे मारण्याची धमकी ,अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर