Mumbai Municipal Corporation Mayor’s post : सध्या राज्याची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत. प्रत्यक्ष दिसले नसले तरी पडद्याआड मोठे राजकारण सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणूक भाजप- शिवसेना शिंदे पक्षांनी युती करून एकत्रित लढवली. निवडणुकीच्या निकालात भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या. ८९ जागांवर भाजपने मजल मारली पण सत्तास्थापेनासाठीची मॅजिक फिगरपासून भाजप काही जागा दूर राहिले. त्यामुळे स्पष्ट बहुमत भाजपकडे नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनच्या केवळ २९ जागा निवडून आल्या आहेत. शिंदे हे महापौर पदासाठी अडून बसल्याची चर्चा आहे. या सगळ्यात आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मोठी खेळी करत शिंदेंना शह देण्यासाठी मोठा डाव टाकला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या दोस्ताशी बोलणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईत महापौर निवडीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ६५ नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीला ११८ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे संख्याबळ ८९ आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिंदेंच्या शिवसेनेसोबत हातमिळणी करून सत्तास्थापन करता येईल. मात्र, एकनाथ शिंदेंनी मोठी खेळी करत निवडून आलेल्या २९ नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील ताज या पंचतारांकित हॅाटेलमध्ये ठेवले आहे. या सगळ्यात भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे मुंबईच्या महापौरपद अडीच वर्ष मिळावे यासाठी आग्रही असून, स्थायी बेस्टसारख्या महत्त्वाच्या समित्यांसाठी अडून बसल्याचे बोलले जाते. तसेच शिंदेंनी ठाकरेंच्या १२ नगरसेवकांना फोडण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे मुंबई महापालिकीच्या महापौर पदाला राजकीय घडामोडींमुळे मोठे वलय प्राप्त करून दिले आहे. शिंदेंना दूर ठेवण्यासाठी हालचाली? मुंबईत महापौर निवडीवेळी ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक अनुपस्थित राहणार असल्याची माहिती असून, बहुमताचा आकडा कमी होऊन भाजपला अप्रत्यक्ष मदत होणार असल्याच्या चर्चा आहेत. या सगळ्याचा थेट लाभ ठाकरेसेनेला होणार नसला तरी शिंदेंसेनेला महापौर पदासाठी दूर ठेवण्याचे समाधान आहे. अशा प्रकारची रणनिती शिंदेंना शह देण्यासाठी आखली जात असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. हेही वाचा : स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक ; अपघातात २१ जणांचा मृत्यू, अनेक जखमी